तीन तासांत पार केले अंतर ः जैन मंदिरात दर्शन घेऊन परतले कुटुंबिय
पाबळ – येथील जैन मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची ये जा असते. देशभरातून याठिकाणी येणारे भाविक आपापल्या चारचाकीने, दुचाकीने तर काहीजण एसटीनेही येतात; मात्र रविवारी चक्क एक जैन कुटुंब पुणे ते पाबळ असा सायकलवर प्रवास करत आले. आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेले. अर्थात त्यांच्या या भक्तीभावामागे, आरोग्य संदेशही लपलेला होता. याची माहिती मिळाल्यावर हर्षभरीत झालेल्या ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
पुणे येथील “लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ या संस्थेचे सदस्य असलेले, संगणक विक्री सेवा सुविधा देणारे व्यावसायिक सत्येन शहा हा उपक्रम राबवतात. यावेळी त्यांनी पाबळ येथील जैन मंदिर दर्शनाचा बेत आखला; मात्र पत्नी मानसी शहा व मुलगा आरंभ यांनीही सहभागी होण्याचे ठरवले आणि तीन तासांत या कुटुंबाने पाबळही गाठले. मंदिरातील दर्शन करून परत फिरताना ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई नागोरी यांनी त्यांची विचारपूस केली. या मागच्या आरोग्य संदेशाचाही उलगडा झाला.
याबाबत बोलताना 45 वर्षांचे सत्येन शहा यांनी सांगितले की, आरोग्यासाठी काहीही यासाठी दोन महिन्यात सायकल चालवायला शिकले आणि पहिला प्रवास पाबळचा केला, अशी माहिती मानसी शहा यांनी दिली. तर बारा वर्षांचा आरंभ म्हणाला, पप्पांनी आत्तापर्यंत मुंबई, गोवा आणि पालितांना दोन हजार किलोमीटर (गुजरात) असा यशस्वी सायकल प्रवास केला. त्यावेळीच प्रेरणा मिळाली. मीही माझ्या सायकल प्रवासाचा “आरंभ’ पुणे ते पाबळ केला.