महापालिकेचे आरोग्य उपकेंद्र तिसऱ्या मजल्यावर; लिफ्टची सुविधा नाही; रुग्णांना चढवेनात पायऱ्या
रवींद्र कदम
नगर – रुग्णांना माफक दरात व तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकांणी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. सावेडी येथील सावित्रीबाई व्यापार संकुलातही आरोग्य केंद्र उपलब्ध करून दिले आहे. मात्र हे उपकेंद्र संकुलातील तीसऱ्या मजल्यावर उभारल्याने, रुग्णांना 45 पायऱ्या चढून जावे लागत असल्याने तिथपर्यंत जाऊ पर्यंत रुग्णांची दम छाक होत आहे. त्यामुळे रुग्णांतून संताप व्यक्त करण्यात येत असून महापालिका प्रशासन यात लक्ष घालील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिका हद्दीतील 50 हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरात मुकुंदनगर, नागापूर, बोल्हेगाव, केडगाव, तोफखाना, माळीवाडा, सावेडी परिसरात असे सात उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील गरिब गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येते. मात्र, सावेडी येथील आरोग्य उपकेंद्र याला अपवाद ठरत असून आरोग्य केंद्र हे सावित्रीबाई फुले व्यापार संकुलनातील तिसऱ्या मजल्यावर उभारण्यात आल्याने रुग्णांना पायऱ्या चढवेनाशा होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने हे उपकेंद्र दुसरीकडे स्थलांतरित करावे असे रुग्णांकडून बोलले जात आहे.
सावेडी येथील आरोग्य केंद्रात रक्त, लघवी तपासणी केली जाते. यामुळे वृद्धांसह, गर्भवती महिलांना तीसऱ्या मजल्यावर चढवून जावे लागत आहे. त्या इमारतीला लिप्टची सुविधा नसल्याने 45 पायरी चढ-उतार करावी लागते. तर अनेक ज्येष्ठ नागरिक इमारतीकडे पाहूनच दुसरेच दुखने उद्भवायचे असे म्हणून आरोग्य विभागाच्या उपकेंद्राकडे पाठ फिरवितात.
आरोग्य उपकेंद्राला जागा उपलब्ध होत नसल्याने सावेडी येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात स्थलांतरित केले आहे. त्या ठिकाणी एक डॉक्टर, दोन तीन परिचारिका असून तेथे दरोजच ओपीडी भरली जात आहे.
डॉ.अनिल बोरगे ,महापालीका आरोग्य अधिकारी
उपकेंद्राला प्रशस्त जागा; रुग्णांची संख्या घटली
नगरपालिका असताना सावेडी उपकेंद्र हे जिल्हारुग्णालयात सुरु होते. त्यामुळे नागरिकांना पायऱ्या चढवून जावे लागत नसे. मात्र, जिल्हा रुग्णालयाला जागा अपुरी पडत असल्याचे कारण देत मनपाचे आरोग्य केंद्र तेथून हलविले व ते नवेपेठेत स्थलांतरित केले. तेथेही जागा कमी पडत असल्याने महापालिका प्रशासनाने ते थेट सावेडी येथे तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केले. मात्र येथे प्रशस्त जागा असून, रुग्णांना पायऱ्या चढवेनाशा झाल्याने जाणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.