धक्कादायक! “बिग बास्केट’वर सायबर हल्ला; 2 कोटी ग्राहकांची गोपनीय माहिती धोक्यात

नवी दिल्ली – भारतातील “बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाला असून सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती चोरली गेली आहे. तसेच ही माहिती डार्कवेबवर 30 लाख रुपयांना विकली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अमेरिकेतील सायबर सिक्‍युरिटी इंटेलिजन्स फर्म साबल इंकने माहिती दिली आहे.

सायबर इंकच्या ब्लॉग पोस्टनुसार, जी माहिती चोरीला गेली आहे त्यामध्ये ग्राहकांची नावे, ई-मेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी ऍड्रेस आणि ठिकाणे आदी संपूर्ण माहितीचा समावेश आहे. यासंदर्भात बंगळुरूस्थित असलेल्या बिग बास्केट कंपनीने शहरातील सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

बिग बास्केटने म्हटले की, आम्ही ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला प्राधान्य देतो. ग्राहकांचा फानान्शिअल डेटा आम्ही स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्डसचे नंबर वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फानान्शिअल माहिती सुरक्षित आहे.

सायबल ब्लॉगच्या पोस्टनुसार, बिग बास्केटच्या ग्राहकांच्या माहितीची चोरी 14 ऑक्‍टोबर 2020 रोजी झाली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत सूचित करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.