सासवड : सासवड (ता. पुरंदर) जवळील चंदन टेकडी येथे पीएमपी व दुचाकीत झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. 9) सायंकाळी उशीरा घडली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान, मृत व जखमी लोकांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
तर जखमी झालेल्यास सासवड येथील रुग्णालयात भरती केले आहे. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. ती पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. सासवडवरून पुण्याकडे निघालेल्या पीएमपीने दुचाकीस्वाराला उडवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.