#CWC23 #SAvNED Toss Update and Playing 11 : एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. नेदरलँड्स संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशालामध्ये पावसामुळे नाणेफेकीला(Toss) उशीर झाला आहे. टॉस जरी झाला असला तरी पावसामुळं अद्याप सामना सुरू झालेला नाही.
कर्णधार बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. चायनामन फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केेेला आहे. त्याचबरोबर नेदरलँड्ससचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही एक बदल केला आहे. अष्टपैलू लोगान व्हॅन बीकचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, रायन क्लेनला वगळण्यात आले आहे.
SA vs NED दोन्ही संघ खालीलप्रमाणे :-
नेदरलँड्स:- विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका:- क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.
दरम्यान,विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून मंगळवारी नेदरलँड्सवर शानदार विजय नोंदवून आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे नेदरलँड्सने 2022 T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेर काढले होते.याचा फायदा पाकिस्तानी संघाला झाला आणि पाक संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आफ्रिकेनं नेदरलँड्सला कमी लेखणे चूक ठरेेल.