#CWC23 #SAvNED Toss Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
नेदरलँड्स संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे.
धर्मशालामध्ये पावसामुळे नाणेफेकीला(Toss) उशीर झाला.दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जरी झाला असला तरी पावसामुळं सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे.
बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. चायनामन फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केेेला आहे. त्याचबरोबर नेदरलँड्ससचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही एक बदल केला आहे. अष्टपैलू लोगान व्हॅन बीकचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, रायन क्लेनला वगळण्यात आले आहे.
दरम्यान,विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून मंगळवारी नेदरलँड्सवर शानदार विजय नोंदवून आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे नेदरलँड्सने 2022 T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेर काढले होते.याचा फायदा पाकिस्तानी संघाला झाला आणि पाक संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आफ्रिकेनं नेदरलँड्सला कमी लेखणे चूक ठरेेल.