ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छितो, तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डि कॉकच्या तूफानी दीडशतकी आणि हेनरिक क्लासेनच्या तडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 50 षटकात 5 बाद 382 धावा करत बांगलादेशसमोर 383 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ICC Men’s Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 South Africa 🏏Bangladesh need 383 Runs to Win
Photo Credit: ICC/Getty#BCB | #SAvBAN | #CWC23 pic.twitter.com/OlIMoFILqg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 24, 2023
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स 12 धावा करून बाद झाला तर रॅसी व्हॅन डर डुसेन एक धावा काढून बाद झाला. हेंड्रिक्सला शोरीफुल यानं आणि डूसेन याला मिराजने बाद केले. यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.
डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक आणि या विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. त्याचवेळी, मार्करामने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी साकिबने तोडली. मार्कराम 69 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला.
💯 Quinton de Kock, 174 (140)
💪 Heinrich Klaasen, 90 (49)
💥 David Miller, 34 (15)Some brutal hitting has lifted South Africa to another massive score 👇#SAvBAN #CWC23https://t.co/kWD1xFTtYH
— ICC (@ICC) October 24, 2023
त्याचवेळी, आपल्या 150 व्या एकदिवसीय सामन्यात, डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. या विश्वचषकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
क्लासेन आणि डी कॉकमध्ये 141 धावांची भागीदारी झाली. क्लासेनने 49 चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरन 15 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मार्को जॅनसेन एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशकडून हसन महमूदने 2 तर मेहदी हसन मिराज, शोरीफुल इस्लाम, शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
SA vs BAN Toss and playing 11 : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजही टेंबा बावुमा खेळत नाही. त्याच्या जागी एडन मार्कराम कर्णधार आहे. आफ्रिकन संघात एक बदल झाला आहे. दुखापतीमुळे लुंगी एनगीटी खेळत नाहीये. त्याच्या जागी लिझार्ड विल्यमसनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी नियमित कर्णधार शकीब अल हसनचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे. तौहीद हृदय हा सामना खेळत नाही.
SA vs BAN : दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे…
बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझार्ड विल्यम्स.