World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match : विश्वचषक 2023 च्या 42व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत संघ पुन्हा गती मिळविण्याचा प्रयत्न करेल.
त्याचवेळी अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर नसला तरी Semifinal मध्ये पोहचण्यासाठी त्यांच्यासाठी समीकरणे खूपच कठीण आहेत. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 438 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल.
AFG vs SA Live Score : अफगाणिस्तानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये…
अफगाणिस्तान संघास 27व्या षटकात 112 धावसंख्येवर पाचवा धक्का बसला. जेराल्ड कोएत्झीने इक्रम अलीखिलला यष्टिरक्षक डिकॉकवी झेलबाद केले. तो 12 धावा करून बाद झाला. याआधी अफगाणिस्तानने 23.5 षटकात 94 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली. रहमत शाह 26 धावा करून बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने मिलरच्या हाती झेलबाद केले. 45 धावांवर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. केशव महाराजने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला यष्टिरक्षक डिकॉकवी झेलबाद केले. त्याला दोन धावा करता आल्या.
अफगानिस्तानला दोन धक्के…
अफगाणिस्तानला पहिला धक्का नवव्या षटकात 41 धावांवर बसला. केशव महाराजने रहमानउल्ला गुरबाजला क्लासेनकरवी स्लिपमध्ये झेलबाद केले. गुरबाजला 22 चेंडूत 25 धावा करता आल्या. त्याचवेळी 10व्या षटकात इब्राहिम झद्रानला कोएत्झीने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्याला 15 धावा करता आल्या.
अफगाणिस्तानने टाॅस जिंकला…
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने दोन बदल केले आहेत. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जेराल्ड कोएत्झी आणि अँडिले फेहलुकवायो यांना संधी देण्यात आली आहे.
SA vs AFG : दोन्ही संघाचं Playing 11 पुढीलप्रमाणे…
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, जेराल्ड कोएत्झी.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इकराम अलीखिल, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक.