Rashid Khan Record : राशिद खान एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे . 2023 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. राशिदच्या आधी हा विक्रम अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर जद्रान आणि फिरकीपटू अष्टपैलू मोहम्मद नबी यांच्या नावावर होता.
वेगवान गोलंदाज शापूर जद्रानने 2015 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 10 विकेट्स घेतल्या होत्या आणि फिरकी गोलंदाज मोहम्मद नबीने 2019 स्पर्धेत 10 बळी घेतले होते. पण आता राशिद खानने 2023 च्या 50 षटकांच्या स्पर्धेत 11वी विकेट घेत हा आकडा गाठला आहे.
विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स…
राशिद खान- 11* विकेट- 2023 विश्वचषक
शापूर झद्रान – 10 विकेट – 2015 विश्वचषक
मोहम्मद नबी- 10 विकेट- 2019 विश्वचषक
गुलबदिन नायब – 09 विकेट- 2019 विश्वचषक
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रशीदने हेनरिक क्लासेनला क्लीनबोल्ड करत या विश्वविक्रमावर आपले नाव कोरले.
#CWC23 #SAvAFG | दक्षिण आफ्रिकेचा 5 विकेट्सने विजय; अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात…
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 42 व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तानचा वनडे विश्वचषक 2023 मधील प्रवास संपला. मात्र, अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत चमकदार खेळ केला. या सामन्यातही अफगाणिस्तानचा संघ संघर्षानंतर पराभूत झाला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने 47.3 षटकांत पाच गडी गमावून 247 धावा केल्या आणि सामना जिंकला.