World Cup 2023 India vs Sri Lanka Match live Score : विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.
त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा ‘करो वा मरो’चा सामना आहे. पराभवामुळे उपांत्य फेरीचा त्याचा मार्ग अत्यंत कठीण होईल. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs SL Live Score: भारताची धावसंख्या 20 षटकांनंतर 1 बाद 120 इतकी झाली आहे. सध्या विराट 54*(58) धावा करून आणि शुभमन गिल53*(61) धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 116 धावांची भागीदारी झाली आहे.
IND vs SL Live Score : विराट पाठोपाठ गिलचेही अर्धशतक…
विराट कोहलीपाठोपाठ शुभमन गिलनेही अर्धशतक लगावले आहे. गिलने 55 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक होते. तर त्याआधी विराट कोहलीने 50 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 70 वे अर्धशतक होते.
तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या जागी फिरकीपटू दुशान हेमंताचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार आणि शमी खेळताना दिसणार आहेत.यावेळी रोहित म्हणाला की, आम्ही नाणेफेक जिंकली असती तर आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता.
#CWC23 #INDvSL : श्रीलंकेनं Toss जिंकला; कर्णधार मेंडिसनं घेतला ‘हा’ निर्णय..
IND vs SL : दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
#CWC23 #INDvSL : श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या..दोन्ही संघाचं Playing 11
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, महिश तिक्षाना, कसून राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.