World Cup 2023 India vs Sri Lanka Match Update : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) यजमान भारत व श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. यंदाच्या स्पर्धेत सलग सहा सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह विजयाची सप्तमी साकार करण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने सातत्याने वर्चस्व राखले आहे. सहापैकी एकाही लढतीत भारताचा संपूर्ण संघ बाद झालेला नाही.
भारत व श्रीलंका यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या जागी फिरकीपटू दुशान हेमंताचा संघात समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार आणि शमी खेळताना दिसणार आहेत.यावेळी रोहित म्हणाला की, आम्ही नाणेफेक जिंकली असती तर आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता.
दुसरीकडे श्रीलंका संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यांनी सहा सामने खेळताना दोनच विजय मिळवले असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. ते उर्वरित लढतींमध्ये एखाद्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीचे गणित बिघडवू शकतात.