World Cup 2023 India vs New Zealand Match Live Score : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिशेलचे शानदार शतक…
डॅरिल मिशेलने 100 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. मिशेलने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे.
Daryl Mitchell’s solid hundred guides the New Zealand innings in Dharamsala 👊@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/h01RZVYh78
— ICC (@ICC) October 22, 2023
IND vs NZ Live Score : शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा,न्यूझीलंड संघाच्या 42 षटकात 4 बाद 226 धावा झाल्या आहेत. सध्या क्रीजवर ग्लेन फिलिप्स 13*(19) आणि डॅरिल मिशेल 102*(103) धावांवर खेळत आहेत.
चौथ्या षटकात नऊ धावसंख्येवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सिराजने डेव्हॉन कॉनवेला स्क्वेअर लेगवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. हा झेल श्रेयसने उत्कृष्ट शैलीत पकडला. 19 धावसंख्येवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली. मोहम्मद शमीने विल यंगला क्लीन बोल्ड केले. यंगने 27 चेंडूत 17 धावा केल्या. न्यूझीलंडची तिसरी विकेट 178 धावांवर पडली. रचिन रवींद्र 87 चेंडूत 75 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. रवींद्रने मिशेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. 205 धावांवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. कुलदीप यादवने टॉम लॅथमला बाद केले. लॅथमने सात चेंडूंत पाच धावा केल्या. कुलदीपने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला. कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(India won the toss and elected to field)या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.
IND vs NZ Live: दोन्ही संघांचं प्लेइंग 11 :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
दरम्यान, विश्वचषक 2023 स्पर्धेपासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर, 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं होते.