World Cup 2023 IND vs ENG Match Live Score :- आज, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो.
लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची 10.1 षटकात 4 बाद 40 अशी अवस्था झाली आहे. सध्या मोईन अली 1*(4) आणि जोस बटलर 4*(6) क्रीजवर आहेत. मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला बाद करून संघाला चौथे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याची ही दुसरी विकेट आहे. शमीने 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले.
बेन स्टोक्सला बाद करत शमीने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. या सामन्यात बेन स्टोक्सची बॅट चालली नाही. त्याला 10 चेंडूत खातेही उघडता आले नाही आणि तो मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.
#CWC23 #INDvENG Live Score : बुमराहची जबरदस्त गोलंदाजी; सलग दोन चेंडूत घेतले दोन बळी…
त्याआधी जसप्रीत बुमराहने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर डेव्हिड मलान आणि जो रूटला बाद करत इंग्लंडला अनुक्रमे पहिला व दुसरा धक्का दिला. मलान 17 चेंडूत 16 धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याच्यानंतर जो रूट फलंदाजीला आलेल्या पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. रूटने रिव्ह्यू घेतला, पण निर्णय भारताच्या बाजूने आला.
तत्पूर्वी, भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही.
#CWC23 #INDvENG : रोहित शर्माची कप्तानी खेळी; टीम इंडियानं इंग्लंडसमोर ठेवलं माफक लक्ष्य…
भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि रोहितनं सर्वाधिक 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 आणि राहुलने 39 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मार्क वुडला एक विकेट मिळाली.
धावफलक :-
भारत – 50 षटकांत 9 बाद 229 धावा. (रोहित शर्मा 87, सूर्यकुमार यादव 49, लोकेश राहुल 39, डेव्हिड विली 3-45, ख्रिस वोक्स 2-33, आदील रशीद 2-35).