World Cup 2023 India vs Afghanistan :- वर्ल्ड कप-2023 स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळत आहेत. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात कर्णधार हशमतुल्लाह शहीदी याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टाॅस झाल्यानंतर जेव्हा अफगाणिस्तानचा संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आला, तेव्हा अफगाणिस्तानचे खेळाडू डाव्या हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात दाखल झाले.
अफगाणिस्तानमध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली. यामुळे भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अफगाणिस्तान संघातील खेळाडू आज त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या (काळ्या फिती) लावून मैदानात उतरले. तसेच यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी क्षणभर मौन पाळत श्रध्दांजली देखील वाहिली.
AfghanAtalan and #TeamIndia have observed a moment of silence and expressed their condolences for the victims of the recent catastrophic earthquakes in Herat and neighboring regions.
📸: ICC/Getty#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvIND | #WarzaMaidanGata pic.twitter.com/BjPEZcwx56
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 11, 2023
दरम्यान, कर्णधार हशमतुल्लाह शहीदी आणि अजमतुल्लाह ओमरजई यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यांनी 50 षटकात 8 गडी गमावताना 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या 17 षटकात बिनबाद 140 धावा झाल्या असून कर्णधार रोहित शर्मा हा 61 चेंडूत 95 तर इशान किशान 41 चेंडूत 38 धावांवर मैदानावर खेळत आहेत.