India vs Afghanistan 2nd T20 : यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे व विराट कोहली यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानने दिलेले 173 धावांचे आव्हान भारताने 15.4 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
For his bowling figures of 2/17, Axar Patel is adjudged Player of the Match as #TeamIndia win the 2nd T20I by 6 wickets.
Scorecard – https://t.co/CWSAhSZc45 #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/ectnmGEfN7
— BCCI (@BCCI) January 14, 2024
अक्षर पटेलने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे अफगाणिस्तान संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. अक्षरने चार षटकांत 17 धावा देत दोन गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. यासह त्याच्या टी-20 मध्ये 200 विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत.
12व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने गुलबदिन नायबला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. तो 35 चेंडूत 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह अक्षर पटेलने 200 वी टी-20 विकेट पूर्ण केली.
200 बळी पूर्ण करणारा अक्षर हा 11वा भारतीय खेळाडू
T20 मध्ये (आंतरराष्ट्रीय आणि लीगसह) 200 बळी पूर्ण करणारा अक्षर हा 11वा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या वर हर्षल पटेल (209 विकेट), रवींद्र जडेजा (216 विकेट), जयदेव उनाडकट (218 विकेट), हरभजन सिंग (235 विकेट), जसप्रीत बुमराह (260 विकेट), अमित मिश्रा (284 विकेट), भुवनेश्वर कुमार (288 विकेट्स) आहेत. , रविचंद्रन अश्विन (301 विकेट), पियुष चावला (302 विकेट) आणि युझवेंद्र चहल (336 विकेट) हे गोलंदाज आहेत.
त्याचवेळी, अक्षरने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये आतापर्यंत 52 सामन्यात 49 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीयांमध्ये तो नवव्या क्रमांकावर आहे.