ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Match Update : : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीच्या जागी फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा संघात समावेश केला.
दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान….
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा 15 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्माने शुभमन गिलसह 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. रोहित 24 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. शुभमन गिल 24 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला.
Innings break!
An excellent batting display from #TeamIndia as we set a 🎯 of 3⃣2⃣7⃣
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/iastFYWeDi#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/Fje5l3x3sj
— BCCI (@BCCI) November 5, 2023
93 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 134 धावांची भागीदारी केली. श्रेयस 87 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने 14 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद 22 धावा केल्या. विराटने 49 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. विराटचे हे 49 वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचवेळी जडेजाने 29 धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराट कोहलीचे दुसरे शतक…
विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत.
वनडेत सर्वाधिक शतके…
विराट कोहली (277 डाव) – 49 शतके
सचिन तेंडुलकर (452 डाव) – 49 शतके
रोहित शर्मा (251 डाव) – 31 शतके
रिकी पाँटिंग (365 डाव) – 30 शतके
सनथ जयसूर्या (433 डाव) – 28 शतके
सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
IND vs SA Live: दोन्ही संघांचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दरम्यान, विश्वचषकात दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने दोन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत.