चेन्नई :– भारतीय संघाने आपल्या विश्वचषकाच्या मोहिमची (Mission World Cup) दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला (India beat Australia) पराभूत करत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मैदान गाजवलं. दीडशतकी भागीदारी करत या दोघांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विराटने केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी करताना एक उत्कृष्ट झेल घेतला. या कामगिरीची बीसीसीाआयने दखल घेत त्याचा गौरव केला आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने जी कामगिरी केली त्यासाठी बीसीसीआयने कोहलीला एक खास पदक बक्षिस (‘Best Fielder of the Match’ medal) दिले आहे. हे पदक कोहलीला फलंदाजी नसून क्षेत्ररक्षणातील त्याच्या अफलातून कामगिरीसाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दीलीप यांच्याहस्ते देण्यात आले. पदक मिळाल्यावर कोहलीने स्पेनचा प्रख्यात टेनिसपटू राफेल नदालप्रमाणे या पदकाचा चावा घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच त्याने हे पदक केवळ माझे नसून संपूर्ण संघाच्या यशाचे प्रतिक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
📽️ BTS from the #TeamIndia 🇮🇳 dressing room 😃👌 – By @28anand
A kind of first 🥇 #CWC23 | #INDvAUS
And the best fielder of the match award goes to….🥁
WATCH 🎥🔽https://t.co/wto4ehHskB
— BCCI (@BCCI) October 9, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्याने स्फोटक फलंदाज मिचेल मार्शला तंबूचा रस्ता दाखवला होता. पण ही विके त्याला विराट कोहलीने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे मिळाली होती. त्यामुळे मार्शला खाते न उघडता तंबूत परतावे लागलं होतं.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालीय. 11 ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी (India vs Afghanistan) भिडणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.