ICC ODI World Cup 2023 England vs Netherlands Match live Score : विश्वचषक 2023 च्या 40व्या सामन्यात आज इंग्लंडचा सामना नेदरलँडशी होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात आहे. इंग्लंडचा संघ आधीच विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ बाद 339 धावा केल्या. नेदरलँडला विजयासाठी 340 धावा करायच्या आहेत.
ENG vs NED Live Score : बास डी लीडेच्या रूपाने नेदरलँड्सला 25.3 षटकात 104 धावसंख्येवर पाचवा धक्का बसला. 12 चेंडूत 10 धावा करून तो बाद झाला. डी लीडेला आदिल रशीदने क्लीन बोल्ड केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, नेदरलँड्सची धावसंख्या 32 षटकात 5 विकेट गमावत 156 इतकी झालेली आहे. सध्या तेजा निदामगुरू 27*(21) आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स 36*(35) क्रीजवर आहेत.
A fifty partnership off 38 balls between Edwards and Nidamanuru – Netherlands are battling hard! 👊
156/5 at drinks after 32 overshttps://t.co/ORE1JUvruI | #ENGvNED | #CWC23 pic.twitter.com/QtxMOJW4ee
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 8, 2023
डेव्हिड विलीने इंग्लंडला चौथे यश मिळवून दिले. त्याने सायब्रँडला ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. सायब्रँड 49 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. नेदरलँड्स संघाला तिसरा धक्का वेस्ली बॅरेसीच्या रूपाने बसला. 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो धावबाद झाला. बॅरेसीने 62 चेंडूत 37 धावा केल्या.
नेदरलँड्सची खराब सुरुवात…
इंग्लंडविरुद्ध नेदरलँड्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी अवघ्या 13 धावसंख्येवर दोन विकेट गमावल्या. सलामीवीर मॅक्स ओडाड आणि कॉलिन अकरमन हे लवकर बाद झाले. मॅक्स ओडाड पाच धावा करून बाद झाला .ख्रिस वोक्सच्या चेंडूवर तो मोईन अलीकडे झेलबाद झाला. कॉलिन अकरमन खाते उघडू शकला नाही. त्याला डेव्हिड विलीने जोस बटलरच्या हाती झेलबाद केले.