पणजी :– महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साकारली.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोठे विजय साजरे करत सुवर्णपदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते.
यापूर्वी केरळ येथे झालेल्या 2015 सालच्या स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या 2022 सालच्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्णपदक मिळवले होते व आता गोवा येथे हॅट्ट्रिक साजरी केली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा 72-26 (मध्यंतर 36-12) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरुवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चस्व राखले होते. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 46-40 असा दणदणीत विजय साजरा केला.
Gold Rush in Kho Kho! 🥇
Maharashtra’s Men’s Kho Kho team emerges victorious in a thrilling match against Odisha, securing the gold medal with a spectacular 72-26 win. Their teamwork and determination shine as they conquer the field.@Nat_Games_Goa @BansodeSpeaks#TeamMaharashtra pic.twitter.com/vLZn3O5tt1— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 8, 2023
महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने 2.10, 1.30 मि. संरक्षण करत 8 गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने 1.22, 1.50 मि. संरक्षण करत 4 गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात 8 गुण वसूल केले, गौरी शिंदेने 1.28 मि. संरक्षण करत 2 गुण मिळवले.