Icc Odi World Cup 2023 England vs Netherlands Match Update : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 40व्या सामन्यात इंग्लंडचा सामना नेदरलँड्सशी होत आहे. एमसीए स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बेन स्टोक्सने इंग्लंड संघासाठी झंझावाती शतक झळकावले.
बेन स्टोक्सचे विश्वचषकातील पहिले शतक होते. त्याने 84 चेंडूंचा सामना करत 108 धावांची खेळी खेळली, ज्यात एकूण 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याने अशी कामगिरी केली जी इंग्लंडच्या इतर कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही.
वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 100 पेक्षा जास्त बळी घेणारा बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना बेन स्टोक्सने ही कामगिरी केली.
A special landmark for a special player ❤️
Take a bow, Ben Stokes 👑 #EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/RJxpnzNkBe
— England Cricket (@englandcricket) November 8, 2023
फलंदाजीतील कामगिरी….
बेन स्टोक्सच्या आकडेवारी पाहिली तरत्याने आतापर्यंत 97 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात 6117 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी 36.41 आणि स्ट्राईक रेट 59.18 आहे. येथे त्याने 13 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत. जर आपण एकदिवसीय सामन्याबदल (ODI) बोललो तर बेन स्टोक्सने आतापर्यंत 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3379 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये बेन स्टोक्सने 43 सामने खेळताना 585 धावा केल्या आहेत. म्हणजे एकंदरीत बघितले तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण दहा हजार धावा केल्या आहेत.
गोलंदाजीतील कामगिरी…
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, बेन स्टोक्सने 97 कसोटीत 197 विकेट्स घेतल्या असून आठ वेळा चार विकेट्स आणि चार वेळा पाच विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. जर आपण एकदिवसीय सामन्याबद्दल (ODI) बोललो तर त्याने आतापर्यंत 112 सामन्यात 74 विकेट घेतल्या आहेत. टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 43 मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. म्हणजे बेन स्टोक्सनं 200 विकेट्सची संख्या ओलांडली आहे.