Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजस्थानात प्रचार दौऱ्यावर आले असताना त्यांचा ‘रथ’ नागौरमध्ये विजेच्या तारेशी संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले होते.
राजस्थान सरकारने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. अमित शहा यांचा ताफा एका निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी बिडियाड गावातून परबतसरला जात असताना ही घटना घडली.
परबतसरमध्ये दोन्ही बाजूंनी दुकाने आणि घरे असलेल्या गल्लीतून जात असताना, त्यांच्या रथाच्या वरच्या भागाला विजेच्या तारेचा स्पर्श झाला ज्यामुळे ठिणगी पडली आणि त्यानंतर वायर तुटली.
सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या घटनेनंतर शहा यांना दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले.या प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. या दौऱ्यात अमित शहांनी कुचमन, मकराना आणि नागौर येथे तीन सभांना संबोधित केले.