World Cup 2023 Australia vs Pakistan Match Live Score : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने चांगली दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने 26 षटकात बिनबाद 176 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर नाबाद 86*(74) आणि मिचेल मार्श नाबाद 77*(82) धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाज आरामात फलंदाजी करत आहेत तर पाकिस्तान मात्र सामन्यात पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
Marsh and Warner hit fifties as Australia are 172-0 at the halfway mark.#AUSvPAK | #DattKePakistani pic.twitter.com/826YkeMyvK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 20, 2023
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर मिचेल मार्शसोबत त्याची शतकी भागीदारीही पूर्ण झाली. डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. मार्शने सलग दुसऱ्या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. श्रीलंकेविरुद्धही त्याने अर्धशतकी खेळी खेळली होती.
अन्… वॉर्नर थोडक्यात बचावला
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पाचव्या षटकात जीवदान मिळाले. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर उसामा मीरने त्याचा झेल सोडला. वॉर्नर आफ्रिदीचा शॉर्ट बॉल नीट खेळू शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि उंचावर गेला. विश्वचषकातील पहिला सामना खेळणाऱ्या उसामा मीरला तो झेल घेता आला नाही. त्याने सोपा झेल सोडला अन् वॉर्नर थोडक्यात बचावला.