नवी दिल्ली – देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांड (Nithari murder case) प्रकरणातील दोन आरोपी, सुरेंद्र कोली (Surendra koli) आणि मोनिंदर सिंग पंढेर (Manindar singh pandher) यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने (high court) पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. दोघांनाही सीबआयच्या विशेष कोर्टाने बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.(Nithari murder latest update) यानंतर आता आरोपी मोनिंदर पंढेरची लक्सर तुरुंगातून सुटका झाली आहे.तो जेलबाहेर आला आहे.
या पार्श्वभूमीवर निठारीतील डी 5 क्रमांकावरील पंढेर यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वर्षी जूनमध्ये त्याला गाझियाबादच्या डासना कारागृहातून लुक्सरला आणण्यात आले होते. आजारी असल्याने त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.
गाझियाबादमधील सीबीआय न्यायालयाने (Gaziyabad cbi court) या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते.उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी पक्षाला या प्रकरणातील आरोप सबळपणे सिद्ध करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्या आधारावर त्यांना निर्दोष सोडून देण्यात आले आहे.
2007 मध्ये मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा घरगुती नोकर कोळी यांच्या विरोधात एकूण 19 खटले दाखल करण्यात आले होते. सीबीआयने 19 पैकी तीन प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी आधीच क्लोजर रिपोर्ट दाखल केले होते. 29 डिसेंबर 2006 रोजी नोएडा येथील निठारी येथील पंढेर यांच्या घरामागील नाल्यातून आठ मुलांच्या सांगाड्याचे अवशेष सापडल्याने हे हत्याकांड उघडकीला आले होते. व त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. पंढेर याच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात आणखी खोदकाम आणि नाल्यांची झडती घेतली असता आणखी काही सांगाडे सापडले.
यातील बहुतांश अवशेष या परिसरातून बेपत्ता झालेल्या गरीब मुलांचे आणि तरुणींचे होते. या प्रकरणाची व्याप्ती पाहून पुढील तपासासाठी ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. सध्या पंढेर नोएडा तुरुंगात तर कोळी गाझियाबाद तुरुंगात आहे. (Nithari case update)
मुलांसोबत करायचे दुष्कर्म
आरोपी अतिशय हुशारीने मुलांना घरी बोलावल्यानंतर हे लोक मुलांचा विनयभंग करायचे आणि नंतर त्यांचा गळा दाबून खून करायचे. एवढ्यानेही त्याचे समाधान झाले नाही तर ते मुलांचे छोटे तुकडे करायचे, त्यांना शिजवून खायचे आणि काही तुकडे घराच्या मागे वाहणाऱ्या नाल्यात टाकायचे.