आझम खान यांचे शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगा

भाजपा नेते आफताब अडवाणी यांचे वादग्रस्त वक्‍तव्य

नवी दिल्ली : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. गुरुवारी आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केले. यामुळे लोकसभेत एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्या या विधानानंतर वाद झाला आहे. रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी टीका केली आहे. आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य अडवणी यांनी केलं आहे.

‘आझम खान यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आझम खान यांचं शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावं. देशात जेव्हा गंभीर समस्येवर चर्चा होते तेव्हा नेहमी आझम खान आणि ओवैसी वाद निर्माण करतात. त्यामुळे महिलांचा अपमान करणाऱ्यांना असं केल्यास काय परिणाम होतात याची जाणीव होईल’ असं भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी म्हटलं आहे. तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले आझम खान बोलायला उभे राहिले. त्यांनी तू इधर-उधर की ना बात कर असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. ‘आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ’ असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)