माहेश्‍वरी समाज उत्पत्ती दिन उत्साहात

सांगवी  – सांगवी परिसर महेश मंडळातर्फे माहेश्‍वरी समाज उत्पत्ती दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्‍वरी समाज बांधवांची कार्यक्रमास मोठ्‌या संख्येने उपस्थित होती. चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस, एकल, युगल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.

मुलांनी प्लास्टिकबंदी, पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा भविष्य वाचवा असे संदेश देत विविध वेशभूषा सादर केल्या. महिलांनी समूह नृत्य, पर्यावरण वाचवा असा संदेश देत नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बलदवा व दीपेश मालानी यांनी केले. तर परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश चरखा, गजानंद बिहाणी, पंकज टावरी, अभिषेक सदानी, पद्मा लोहिया यांनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.