पुणे: सिम्बॉइसिस महाविद्यालयात २६ फेब्रुवारी २०२० या तारखेला प्रोटेख २०२० ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरगोस यश मिळवले.ही एक राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा होती. या स्पर्धेत राष्ट्रातील विविध भागातील विध्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
कुसरो वाडिया महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या मयूर मोरे, शुभम नागपूरकर आणि हेमंत निपसे यांनी प्रकल्प स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकाविले. मयूर, हेमंत व शुभम यांनी उत्तमरीत्या ‘लायफाय’ या विषयावर प्रकल्प सादर केले. त्यांना सिम्बॉइसिस महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रथम बक्षीस देऊन सन्मानित केले. कुसरो वाडिया महाविद्यालयाचे अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक, प्रा.बी.एस.देवरे, प्रा.ए.वाय.बोरकर यांनी त्यांना उत्तेजित व प्रोत्साहित केले. प्राचार्य व्ही.आर.राव यांनी अभिनंदन केले. संपूर्ण महाविद्यालयाला त्यांचा अभिमान आहे.
– श्रेया अंबेटी,
कॉलेज रिपोर्टर,
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी