क्यूबा – येथे राष्ट्रपती मिगेल दियाज कनेलचं सरकार विरोधात लोक आंदोलन करत आहेत. याआंदोलनावेळी ( दि ११ – १२ जुलै ) ला तेथील स्थानिक पोलिसांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली होती. यामुळेच क्यूबातील सरकार दबावात आहे.
याच आंदोलनावरून क्यूबाचे राष्ट्रपती मिगेल दियाज कनेल यांनी अॅडल्ट स्टार मिया खलीफाला जबाबदार धरलं आहे. तिच्यावर आरोप लावत ते म्हणाले, ‘अमेरिकन सरकारसोबत मिळून मिया खलीफा क्यूबा सरकार विरोधात काम करत आहे. ती आमच्या सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे.’ असे आरोप मिगेल दियाज कनेल यांनी तिच्या लावले आहे.
मात्र या आरोपांवर मिया खलिफाने ट्विटरवर ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे ती म्हणाली,’ मला लोकांना तुमच्या अमानवतेबाबत जागरूक करण्यासाठी कोणतंही सरकार पैसे देत नाहीये. मी हे फ्रीमध्ये आणि आपला वेळ देऊन करते’. असं म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केले आहे.