नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यात कमी-जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे रुग्णसंख्येत घट ही तेवढीच आहे.
अश्यातच, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना नियंत्रणाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ’ यांची पाठ थोपटली असल्याचे समजले जात आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.
कोरोना से निपटने में उत्तर प्रदेश के प्रयास उल्लेखनीय हैं।
मैं काशी के अपने साथियों का, यहां शासन-प्रशासन से लेकर कोरोना योद्धाओं की संपूर्ण टीम का विशेष रूप से आभारी हूं।
आपने दिनरात जुटकर जिस प्रकार काशी में व्यवस्थाएं खड़ी कीं, वो बहुत बड़ी सेवा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 15, 2021
मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला. असं मोदी म्हणाले.