पाकिस्तानातील सोशल मीडिया सेलिब्रिटी, मॉडेल आणि स्पोर्टस कॉमेंट्रेटर मिया खलिफा आपल्या टिकटॉकवर प्रचंड ऍक्टिव्ह असते. आपले वेगवेगळ्या गेटअपमधील फोटो, व्हिडिओ ती टिकटॉकवर सतत अपलोड करत असते.
तिच्या फॅन्सचे लाईक हे तिच्यासाठी टॉनिक असते. मात्र तिच्या टिकटॉक अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. मिया खलिफा पूर्वी पूर्वी पोर्न स्टार होती.
त्यामुळे तिच्या व्हिडिओमधून अश्लिलतेचा प्रसार होत असल्याचा आरोप करून सरकारने तिच्या टिकटॉक अकाउंटवर बंदी घातली आहे.
सरकारने या कारवाईबाबत मिया खलिफाला काहीही कळवलेलेही नव्हते. तिला तिच्या फॅन्सकडूनच याबाबत समजले. त्यामुळे मिया चांगलीच भडकली आहे.
आतापर्यंत टिकटॉकवर पोस्ट केलेले सगळे व्हिडीओ ट्विटरवर पुन्हा एकदा पोस्ट करणार असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या उत्तरावर तिचे फॅन्स खूप खुष झाले आहेत. त्यांनी मिया खलिफाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.
यामुळे ती हरखून जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण टिकटॉक प्रमाणे तिच्या ट्विटर अकाउंटवरही बंदी घातली गेली तर काय? याचा विचार तिने केलाच असेल. पण त्याच्यावरही मिया खलिफाकडे काही तरी उत्तर असेलच.