IPL 2024, CSK vs RCB Weather Report : इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. एका बाजूला, 5 वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) असेल, ज्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याशी (RCB) होईल. यावेळी आरसीबी केवळ नव्या नावाने मैदानात उतरणार नाही तर त्यांच्या जर्सीचा रंगही बदलला आहे. CSK vs RCB, दोन्ही संघाचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे कोणीही हा सामना पाहण्याची संधी गमावू इच्छित नाही, परंतु हवामान कधीही बदलू शकते. येथे जाणून घ्या, IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात हवामान कसे असेल.
CSK विरुद्ध RCB सामन्यातील हवामानाची स्थिती…
गुरुवारी, 21 मार्च रोजी चेन्नईमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती पण तसं झाले नाही, परंतु शुक्रवार, 22 मार्च रोजी सामन्यादरम्यान हवामान सामान्य (आकाश निरभ्र) राहील. खराब हवामान RCB विरुद्ध CSK सामन्यात हस्तक्षेप करणार नाही, परंतु मैदानामध्ये आर्द्रता 75 टक्के असणार आहे, जी खेळाडूंसाठी समस्या बनू शकते. सामन्याच्या वेळी तापमान 31 अंश असू शकते आणि वारेही ताशी 18 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
BROTHERS- From one to another! 1️⃣3️⃣🫂3️⃣1️⃣#WhistlePodu #Yellove 🦁💛 @Ruutu1331 @faf1307 pic.twitter.com/9yq4QMotjL
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, नंतर खेळणाऱ्या संघाला धावा काढणे कठीण आहे. जसजसा वेळ जातो तसतशी खेळपट्टी संथ होत जाते, त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.
CSK विरुद्ध RCB संभाव्य प्लेइंग 11 :-
CSK : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान आणि मुकेश चौधरी.
IPL 2024 : एमएस धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….
RCB : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), करण शर्मा, मयंक डागर, रीस टोपली, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार विशाक.