कोलकत्ता – येथे सहा जणांकडून ३४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन आरोपी हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. तर हि महिला स्थानिक भाजप कार्यकर्त्याची पत्नी आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, संबंधित घटनेचा तपास पोलिसांनी करून सहा आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८ च्या सुमारास सहा आरोपी तिच्या घरी शिरले आणि तिचे हात पाय बांधून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला यावेळी तिचे तोंडही दाबून ठेवले गेले ज्यामुळे ती ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबाने महिलेला उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयात नेलं. असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटना स्थळी तपास सुरु केला या तपासात सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत.याशिवाय रहमत अली आणि महबूल असे दोन आरोपी आहेत.
दरम्यान या घटनेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. टीएमसी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.