जयपूर -राजस्थानमधील भाजपच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग केले. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या पारड्यात मत टाकले.
त्या क्रॉस-व्होटिंगमुळे नाचक्की झालेल्या भाजपने कुशवाह यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले. कुशवाह यांच्याकडून भाजपने स्पष्टीकरणही मागवले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या आमदारांसाठी पक्षादेश जारी केला होता.
त्यानुसार, आमदारांना मतदानासंबंधी सूचना देण्यात आली होती. मात्र, कुशवाह यांनी पक्षादेश झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे.