मुंबई – देशातील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र, या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंगची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा ते आसामपर्यंत क्रॉस व्होटिंग पाहायला मिळाले. यामुळे विरोधी पक्षांमध्ये क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने कोणतेही क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी आधीच आमदारांसोबत बैठका घेतल्या आहेत. मात्र, मुर्मू यांना राज्यातील 200 आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने विरोधक चिंतेत आहेत.
जीएसटी विभागांची कारवाई; 72 कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्यास अटक
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीदरम्यान क्रॉस व्होटिंग झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये त्यांच्या मतांचे संरक्षण करण्याबाबत काही चिंता आहे. दरम्यान, मुर्मू यांना 200 मते मिळाल्यास कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हा आणखी एक धक्का असेल, असे मानले जात आहे.
केजरीवाल म्हणाले… “सिंगापूर दौऱ्याला परवानगी नाकारण्यामागे केवळ राजकारण”