भ्रष्टाचारी पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी करा – सचिन साठे

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकारामनगर पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देणाऱ्या महापालिकेतील भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी चिंचवड असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे याच्यासह शीतल कोतवाल, नितीन पटेकर, नवनाथ डेंगळे, रमजान आत्तार, संजणा कांबळे, वंदना आराख, राजश्री वेताळे, तिफन्ना काळे, तोफा पवार, जया आराख, रोशन शेख, अनिता रूपटक्के आददी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पीपीपी तत्वावरील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ऐश्‍वर्यम बांधकाम व्यावसायिकाबरोबर घरकुल प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. या बांधकाम व्यावसायिकाबाबत व प्रकल्पाबाबत कोणतीही शाश्‍वती नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वरील विषयांबाबत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार संगनमताने केला आहे. हे कॉंग्रेसने वेळोवेळी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे, असे विश्‍वास कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)