ग्रामीण महाविद्यालयांनी पुढील 25 वर्षाचे नियोजन करावे  

पारनेर – ग्रामीण महाविद्यालयाने 25 वर्षाच्या वाटचालीतून पुढील 25 वर्षाचे नियोजन केले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजच्या ज्या शैक्षणिक चळवळीतून बहुजन ग्रामीण शिक्षणाची सुरवात झाली त्याच्या वटवृक्ष करायचा असेल तर पारंपारिक शिक्षण बदलून नॉनो टेकनोलॉजीचे शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्याने अंगीकृत केले पाहिजे.,असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील श्री ढोकेश्‍वर महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या समारंभाचे अध्यक्षपद जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी भूषविले. त्यांच्या जन्म दिवशीच या महाविद्यालयाची स्थापना झाली म्हणून सांगता समारंभात त्यांचा वाढदिवस रौप्यमहोत्सव, भौतिक सुविधांचे उदघाटन असा त्रिवेणी संगम महाविद्यालयाने साधला होता.

सोहळ्यासाठी संस्थेचे जेष्ठ विश्‍वस्त सीताराम खिलारी,चंद्रकांत मोरे, सरपंच सुनीता झावरे, कोरठाण देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, उद्योजक अशोकशेठ कटारिया, आम्ही टाकळीकर व सावली प्रतिर्षठानचे डॉ भाऊसाहेब खिलारी,संतोष सोनवळे, संदीप खिलारी,आदीनाथ पायमोडे आदींसह माजी विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थितीत होते.
या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शांता गडगे व प्रा. समीर दळवी यांनी केले.आभार डॉ. विजय सुरोशी यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)