गुजरातमधील 29 सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 11 महिन्यांतील कारवाई

अहमदाबाद – गुजरातमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 11 महिन्यांत राज्य सरकारच्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

बेनामी आणि भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या मालमत्ता उघडकीस आणण्यासाठी गुजरातमध्ये एसीबीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेमुळे भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचारी रडारवर आले आहेत. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत 11 अधिकारी आणि 18 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यांतर्गत ती कारवाई करण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेची एकूण किंमत 40 कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, एसीबीने सोमवारी पाटबंधारे खात्यातील निवृत्त अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याने 1 कोटी 38 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे निष्पन्न झाले. सेवेत असताना त्याने 8 ते 9 वर्षांत बॅंक खात्यांमध्ये 22 लाख रूपये ठेवल्याचेही समोर आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.