सातार्‍यात कार्यकारी अभियंत्यावर विनयभंगाचा गुन्हा 

 

सातारा : येथील कृष्णानगरमधील कृष्णासिंचन विभागाचा कार्यकारी अभियंत्यावर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी एका युवतीने तक्रार दिली असून तिच्या सहकारी मैत्रिणीचाही अभियंत्याने विनयभंग  केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , संबंधित युवती कामानिमित्त संशयिताकडे  गेली होती. त्यावेळी संशयिताने युवतीकडे एकटक पाहत होता. संबंधित पीडित युवतीच्या सहकारी मैत्रिणीलाही हाच अनुभव आला. कामानिमित्त त्याच्याकडे त्यांना जावे लागत असल्याने हाताला स्पर्श करणे, शारिरीक जवळीक करणे, अश्लिील चाळे करणे आदी प्रकार वाढले.

यामुळे संबंधित युवतीने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांकडे याची तक्रार केली होती. त्यावेळी संबंधित संशयित ाला  सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र, पुन्हा परत आल्यावर त्याने पूर्वीसारखाच प्रकार सुरू केला. त्यामुळे संबंधित युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.