नागपूरमधील डॉक्‍टर दांपत्याविरुद्ध गुन्हा नोंद; 2.52 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

 

नागपूर- नागपूर येथील नागरी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्‍टर दांपत्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत संबंधित दाम्पत्यांकडे 2.52 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्याविरोधात 2014 साली अँटी-ग्राफ्ट एजन्सीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

डॉ. प्रवीण गंतावार आणि त्यांची पत्नी डॉ. शीलू गंतावार असे या दाम्पत्यांची नावे आहेत. डॉ. प्रवीण गंतावार आणि त्यांची पत्नी डॉ. शीलू गंतावार हे दाम्पत्य 2007 पासून नागपूर पालिका (एनएमसी)द्वारा संचालित इंदिरा गांधी रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात सीताबुल्डी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 1 (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या नावाने नोंदविण्यात आलेली निवासस्थाने, कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये शोध घेण्यात आला आहे. त्यावेळी हे दांपत्य धंतोली भागात खासगी रुग्णालय चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.