शिक्रापूर -करंदी (ता. शिरूर) येथील विवाहितेने आपल्या चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली याप्रकरणी विवाहितेचा पती भगवान राजेंद्र चंद्रावळे व सासू चंद्रभागा राजेंद्र चंद्रावळे यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी बाळू बबन आरगडे (वय 50, रा. कडूस ता. खेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेचा पती भगवान राजेंद्र चंद्रावळे व सासू चंद्रभागा राजेंद्र चंद्रावळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
करंदी (ता. शिरूर) येथील विवाहिता मोनिका लग्नानंतर काही दिवसांनी पती व सासू माहेरहून शेतीच्या कामासाठी पैसे आण असे म्हणत तिचा छळ करीत होते. दरम्यान मोनिकाच्या वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने मोनिकाचे पती व सासुंना समजावून सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.