चोरीच्या संशयाने कामगाराला माराहण; मारहाणीत गंभीर जखमीचा मृत्यू

देहुरोड – टपरीवर कामाला असणाऱ्या तरुण कामगाराला चोरीच्या संशयाने मालकासह दोघांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली. या कामगाराचा सोमवारी (दि. 21) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मालकाला अटक केली आहे.

मल्लेनाथ पुंडलिक चिंचोले (वय 22, मूळ रा. आचलेर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी मारुती गजेंद्र खरात यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तीर्थप्रसाद कुटराज गौडा (वय 33, रा. दत्तनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या मालकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मल्लेनाथ हा गौडा याच्या टपरीवर कामाला होता. त्याने चोरी केल्याचा संशयामुळे गौडा आणि त्याच्या मित्राने 25 मार्च मारहाण केली होती.

मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचे प्रथम खासगी आणि पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मालक गौडा यास देहुरोड पोलिसांनी अटक केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.