आज पासून राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार

शेवटच्या टप्यातील राज यांच्या चार सभा..

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर परवानगी मिळाली असून, आज पासून राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार आहे. मात्र, या तोफेच्या तोंडी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा असणार यात कुठलीही शंका नाही.

दरम्यान, मंगळवार २३ एप्रिल पासून राज ठाकरेंची ‘काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात’ (आज) पहिली सभा होणार आहे. तर, बुधवार २४ एप्रिलला ‘भांडुप येथील जंगल मंगल रोडवर खसडी मशीन’ येथे दुसरी सभा होणार आहे. ‘खांदेश्वर स्टेशनजवळील गणेश मैदानावर’ गुरुवार २५ एप्रिल रोजी तिसरी सभा होणार आहे. तर, चौथी सभा शुक्रवार २६ एप्रिल रोजी नाशिकमधील ‘हुतात्मा अनंत कान्हेरे’ मैदानावर होणार आहे. या चारही सभांची वेळ सायंकाळी साडेपाच(५.३०) वाजताची ठरली आहे.राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नसून, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे राज ठाकरेंनी ठरवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.