लोणी काळभोर -लॉकडाऊनमध्ये दारुची पार्टी करण्यास विरोध करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना ग्रामीण पोलीस दलातील एका आधिकाऱ्याने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री घडला आहे. याप्रकरणी संबधित गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी तक्रार देण्यास न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही.
पोलीस अधिकारी हे गेल्या 3 वर्षांपासून लोणी काळभोर येथील एका गृहनिर्माण संस्थेत भाडेतत्वावर राहात आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात आले आहे. त्यांची बदली झाल्याने ते मंगळवारा (दि. 18) ही सदनिका सोडुन बदलीच्या ठिकाणी राहण्यास जाणार होते.
तत्पूर्वी या अधिकाऱ्यांनी परीसरातील काही मित्रांसाठी सोमवारी रात्री घरातच ओली-सुक्या पार्टीचे आयोजन केले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पार्टी सुरू होताच, लॉकडाऊन असल्याचे सांगत संस्थेच्या पदाधिकारी, रहिवाशांनी अधिकाऱ्यास पार्टी करु नये.
अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगून यास नकार दिला. तसेच रहिवाशांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.
पार्टी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन मद्यपी पोलीस अधिकाऱ्याकडुन रहिवाशांना मारहाण व शिवीगाळ, गोंधळ घातला ही बाब खरी आहे.
मात्र संबधित गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी तक्रार देण्यास पुढे न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. शिवीगाळ व मारहाण झालेले नागरीक तक्रार देण्यास तयार असतील तर पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यास
तयार आहेत.
– राजेंद्र मोकाशी, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर