दौंड – मोक्याच्या गुन्ह्यात व येरवडा जेलमधून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यात आला. अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड पोलीस स्टेशन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे या ठिकाणी अटकेत असलेले आरोपी देवगण अजिनाथ चव्हाण (वय 25), गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22, दोघे रा. बोरावके नगर, दौंड),
अक्श्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण (वय 22, रा. माळवाडी, लिंगाळी ता. दौंड) हे व अजून दोन जण 16 जुलै 2020 रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहामधुन पळुन गेलेले होते. त्यातील देवगण चव्हाण व गणेश चव्हाण यांना यापूर्वीच अटक केली होती. आरोपी अक्ष्या उर्फ
अक्षय कोंडके चव्हाण हा त्यांचे राहते घरी जात येत असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाल्याने 4 मार्च रोजी रात्रीगस्त दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या स्टाफने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.