पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार

चिखली येथील प्रकार : पतीला अटक

पिंपरी – घरगुती भांडणाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कदायक घटना बुधवार दि. 19 जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास चिखली येथील मोरेवस्ती परिसरात घडली. जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा.गोकुळ सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती विजय पुंडलिक गोसावी( वय 28 रा. मतराला ,ता.पानसेलम, बडवाने, मध्यप्रदेश) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री आणि विजय हे पती- पत्नी असून त्यांच्यामध्ये नेहमी घरगुती कारणावरून भांडण व्हायचे. बुधवारी याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी, संतापलेल्या विजयने त्याच्या जवळील चाकूने जयश्रीच्या गळ्यावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जयश्री या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीसांनी आरोपी विजयला अटक केले आहे. जखमी जयश्रीवर रूग्णालयात उपचार सरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.