मेडिकलचे शटर उचकटून चोरी

पिंपरी – पिंपरी येथील भाटनगरमधील मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील 22 हजार 600 रुपये चोरले. ही घटना 18 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अरविंद हिंमतराव पुरोहित (वय- 25 रा. चिंचवड स्टेशन जवळ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पुरोहित यांचे पिंपरी येथील भाटनगर येथे श्रीसाई मेडीकल हे दुकान आहे. ते दि. 18 जून रोजी रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 22 हजार 600 रुपये घेवून पसार झाले. बुधवारी सकाळी दुकानात आल्यानंतर पुरोहित यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

Leave A Reply

Your email address will not be published.