पिंपरी – फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरुने फ्लॅट खाली केल्यानंतर डिपॉझिटच्या पैशावरुन झालेल्या वादातून घर मालकिणीचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 1) हिंजवडी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संदीप तालोरी (रा. हैद्राबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप तालोरी यांच्या फ्लॅटमध्ये आरोपी संदीप हा मागच्या काही महिन्यांपासून भाड्याने राहत होता. हा फ्लॅट संबंधीत महिलेने एकाला विकल्यानंतर फ्लॅट खाली करण्यास सांगितले. फ्लॅट खाली केल्यानंतर घरमालकिणीने त्याला डिपॉझिटच्या रकमेचा धनादेशही दिला. मात्र, आरोपीने रोख रक्कम देण्याचे सांगितले. त्यावरुन झालेल्या वादातून महिलेच्या भावाला मारहाण करुन तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.