पुणे -महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी साबळे वाघिरे कंपनीच्या मालकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संजय साबळे वाघिरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दिपकअण्णा सिताराम काटे (27, रा. इंदापूर) यांनी तक्रार दिली.
साबळे वाघिरे कंपनीचा संभाजी बिडी नावाचा बिडीचा ब्रॅंड आहे. त्यांनी महापुरुषाच्या नावाचा एकेरी उल्लेख करून महापुरुषांचा अवमान केला आहे. यामुळे काटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी करत आहेत.