किरण क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत अथर्व पाटील याने केलेल्या नाबाद 47 धावांच्या खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने जस क्रिकेट अकादमी(अमानोरा)संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर पार पडलेल्या असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना किरण क्रिकेट अकादमीच्या राणा सरनोबत (2-19), आयुश अनुशे (2-32), वरद पाटील( 1-9), ओम श्रीभाते (1-21) यांनी केलेल्या गोलंदाजीपुढे जस क्रिकेट अकादमी (अमानोरा) संघाला 20 षटकांत 7 बाद 99 धावाच करता आल्या. यात माहीर रावळने 29 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 40 धावा, रणवीर सिंग चौहानने 10 धावा केल्या. 99 धावांचे आव्हान किरण क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 12.4 षटकांत 2 बाद 102 धावा करून पूर्ण केले.

यामध्ये अथर्व पाटीलने 43 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावांची संय्यमपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अथर्वला रुद्रव श्रीभातेने 25 धावा करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी अथर्व पाटील ठरला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडकासह इतर पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्राचे माजी रणजीपटू प्रभाकर मोरे व जयदीप नारसे, प्रकाश टिंगरे मैदानाचे मालक योगेश टिंगरे व अजय टिंगरे, सतीश गायकवाड आणि जस क्रिकेट अकादमीचे संचालक आणि महाराष्ट्राचे माजी रणजीपटू पराग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल –

अंतिम फेरी – जस क्रिकेट अकादमी (अमानोरा): 20 षटकांत 7 बाद 99 (माहीर रावळ 40, रणवीर सिंग चौहान 10, राणा सरनोबत 2-19, आयुश अनुशे 2-32, वरद पाटील 1-9, ओम श्रीभाते 1-21) पराभूत वि. किरण क्रिकेट अकादमी – 12.4 षटकांत 2 बाद 102 (अथर्व पाटील नाबाद 47, रुद्रव श्रीभाते 25, समर्थ वाबळे 1-29), सामनावीर-अथर्व पाटील.

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट फलंदाज: शिव हरपाळे(184धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: तनिश बागाने(12विकेट);
मालिकावीर: अथर्व पाटील (145धावा);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: श्रेयश यादव.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.