अमेरिकेची विमानवाहू युद्ध नौका व अन्य युद्धसामग्री मध्यपुर्वेत तैनात; इराणला स्पष्ट संदेश

वॉशिंग्टन – इराणकडून सुरू असलेल्या आक्षेपार्ह हालचालींना प्रयत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपली एक सुसज्ज विमानवाहू युद्धनौका आणि हवाई हल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विमानांचा ताफा मध्यपुर्वेत तैनात केला आहे. हा अमेरिकेने इराणला दिलेला एक स्पष्ट संदेश मानला जात आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले की इराणडून अमेरिकेच्या हिताच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाच तर त्याला अमेरिकेकडून अभुतपुर्व प्रतिसाद दिला जाईल हे त्यांच्या लक्षात यावे म्हणून ही सामग्री तिथे तैनात करण्यात आली आहे.

अमेरिकेने तेथे तैनात केलेल्या सामग्री मध्ये स्ट्राईक फोर्स आणि बॉंम्बर टास्कफोर्सचा समावेश आहे. अमेरिकेने इराणवरील निर्बंध आणखी कडक केल्यानंतर इराणकडून अमेरिकेशी संबंधीत ठिकाणांवर किंवा त्यांच्या मित्र देशांच्या ठिकाणांवर हल्ले केले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने तेथे ही सज्जता ठेवतानाच इराणला मर्यादेत राहण्याचाही इशारा दिला आहे.

इराणवर घालण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करण्याच्या प्रकियेचा एक भाग म्हणून अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणहून तेल आयात करण्यासाठी सध्या ज्या देशांना सवलत लागू आहे ती सवलतही काढून घेतली आहे. अमेरिकेने भारतालाही इराणकडून तेलाची आयात पुर्ण थांबवण्याची सूचना केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.