प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा : टीसीएस, सिमन्स संघांचे विजय

पुणे -टीसीएस, आयरिसर्च, सिमन्स, सिनरझिप या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत येथे होत असलेल्या प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या लढतीत टीसीएस संघाने डॉश्‍चे बॅंक संघावर 74 धावांनी मात केली.

टीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 172 धावा केल्या. यात विक्रमजितसिंगने 47 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारसह 52 धावा केल्या. राहुल गर्गने 15 चेंडूंत 37 धावांची आक्रमक खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना डॉश्‍चे बॅंक संघाचा डाव 98 धावांतच आटोपला. दुसऱ्या लढतीत आयरिसर्च संघाने रोमहर्षक लढतीत टीई कनेक्‍टिव्हिटी संघावर चार धावांनी मात केली. चांगल्या सुरुवातीनंतर आयरिसर्च संघाचा डाव 19.5 षटकांत 149 धावांत आटोपला.

संजय खेरने एका बाजूने किल्ला लढवून 54 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 91 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीई कनेक्‍टिव्हिटी संघाला 8 बाद 145 धावाच करता आल्या. कौस्तव सर्मा मैदानात असेपर्यंत टीई कनेक्‍टिव्हिटी संघाला विजयाची आशा होती. मात्र, अखेरच्या षटकात कौस्तव धावबाद झाला आणि टीई कनेक्‍टिव्हिटी संघाचे आव्हानही संपुष्टात आले. कौस्तवने 43 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारसह 61 धावा केल्या.

तिस-या लढतीत सिनरझिप संघाने आयडीयाज संघावर पाच गडी राखून मात केली. आयडियाज संघाने दिलेले 156 धावांचे लक्ष्य सिनरझिप संघाने पाच गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. चौथ्या लढतीत सिमन्स संघाने टिया संघावर आठ गडी राखून मात केली. यात सिमन्स संघाने अतुल पवारने 23 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 67 धावांची झंझावाती खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – 1) टीसीएस – 20 षटकांत 7 बाद 172 (विक्रमजितसिंग 52, राहुल गर्ग 37, निकुंज अगरवाल 35, उमेश शर्मा 3-27, राजशेखरण सी. 2-27) वि. वि. डॉश्‍चे बॅंक – 18 षटकांत सर्वबाद 98 (गौरव सचदेव 30, इमाम जाफर 28, शुवरा बदुरी 21, अभिनव कालिया 3-15, आकाश म्हस्के 2-19)

2) आयरिसर्च – 19.5 षटकांत सर्वबाद 149 (संजय खेर 91, अक्षय खोडे 22, यमनाप्पा गड्डी 4-26, प्रकाश अत्रे 2-36) वि. वि. टीई कनेक्‍टिव्हिटी – 20 षटकांत 8 बाद 145 (कौस्तव सर्मा 61, अबिद अली 29, ऋषीकेश साळुंके 3-33, अशोक अय्यर 1-17).

3) आयडियाज – 20 षटकांत 8 बाद 155 (परेश दहिवाल 62, अमोल चौधरी नाबाद 42, राहुल पंडिता 2-31, नागमणी प्रसाद 2-12) पराभूत वि.सिनरझिप19.3 षटकांत 5 बाद 156 (आकाश बिहाडे नाबाद 57, आशिष गोखले 25, राहुल पंडिता 25, अवनिशकुमार नाबाद 19, रोझेबेह भारडा 2-13, अरुणप्रतापसिंग 2-36).

4) टिया – 20 षटकांत 8 बाद 137 (प्रणय मोरे 38, विकाश आनंद 30, विश्वेश शर्मा 30, दीपककुमार 2-9) पराभूत वि. सिमन्स – 11.5 षटकांत 2 बाद 139 (अतुल पवार 67, दीपककुमार नाबाद 38, हिमांशू अगरवाल नाबाद 21, प्रणय मोरे 1-6).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.